गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण वेगाने होत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेसला अनेक प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच एका मराठमोळ्या गायकाने ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमधून प्रवास केला आहे. त्याने पोस्ट करत त्याचा अनुभवही सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी प्रवास कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

“मी नुकताच वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. खरोखरच खूप छान वाटले. मी जगभरात प्रवास करतो, पण या कामगिरीसाठी मला भारतीय रेल्वेचे कौतुक करावेसे वाटते आणि त्यांचा अभिमानही वाटतो. मी आशा करतो की, वंदे भारत पुरवत असलेल्या सर्व सुखसोयी अशाचप्रकारे कायम राहतील”, असे महेश काळेने म्हटलं आहे.

आणखी वाचा : आदेश बांदेकरांच्या लेकाचा गर्लफ्रेंडबद्दल खुलासा, म्हणाला “माझं आयुष्य…”

दरम्यान महेश काळेच्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी महेश काळेला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्याला कुठे चालला आहात, असा प्रश्नही कमेंट करत विचारला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian classical vocalist and marathi singer mahesh kale share vande bharat express experience nrp