अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल एकमेकांना डेट करत असल्याचं जगजाहिर आहे. पण या दोघांनी अजूनही आपल्या नात्याची फारशी उघडपणे कबुली दिली नाही. अथिया-केएल राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही सध्या चर्चा रंगत आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असून दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं जातंय. आता या दोघांच्या लग्नाबाबत नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – “अजूनही शिकतोय, धडपडतोय पण…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत

अथिया आणि केएल राहुल पुढील तीन महिन्यांमध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. अथियाच्या जवळच्या व्यक्तीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, “३ वर्षांपासून अधिक काळ अथिया-के एल राहुल एकमेकांना डेट करत आहेत. पुढील ३ महिन्यांमध्ये हे दोघं लग्न करतील. सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.”

शिवाय राहुलच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या आई-वडिलांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे. तसेच मध्यंतरी अथिया-राहुलने वांद्रे येथे नवं घर खरेदी केलं. ते घर पाहण्यासाठी देखील राहुलचे कुटुंबिय गेले होते. लग्नानंतर अथिया-राहुल याच घरात राहणार आहेत. मुंबईमध्येच अभिनेता सुनिल शेट्टीच्या लेकीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा – मराठीमधील आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, प्रविण तरडेंची महत्त्वपूर्ण भूमिका

याआधी डिसेंबरमध्ये अथिया-राहुल लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. अथिया आणि केएल राहुल नेहमीच एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. आता या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची सारेच जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader