शुबमन गिल मैदानात तुफानी फलंदाजीमुळे आणि मैदानाबाहेर त्याच्या वैयक्तिक लाइफमुळे चर्चेत असतो. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक झळकावणाऱ्या गिलला हैदराबादच्या खोडकर चाहत्यांनी ‘सारा-सारा’ म्हणत ट्रोल केले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. कधी सारा अली खान तर कधी सारा तेंडुलकरमुळे शुभमन गिल चर्चेत येत असतो. नुकतंच त्यांनी आवडत्या अभिनेत्रीबद्दल भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यंतरी शुभमन गिलचा बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच शुभमन नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने आवडत्या अभिनेत्रीचे नाव घेतले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे रश्मिका मंदाना, ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. लवकरच ती आता ‘पुष्पा २’ मध्ये दिसणार आहे.

गांधीगिरीनंतर आता संजू बाबा करणार ‘हेरा फेरी’; तिसऱ्या भागात झळकणार, अभिनेत्याने केला खुलासा

मुलाखतीदरम्यान शुभमन गिलला त्याच्या क्रशचे नाव विचारण्यात आले. यावर क्रिकेटरने उत्तर देण्याचे टाळले. नंतर खूप आढेवेढे घेत रश्मिका मंदानाचे नाव घेतले. शुभमन गिलच्या या कमेंटवर रश्मिका मंदानाने सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती काय उत्तर देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

रश्मिका मंदानाने दाक्षिणात्य चित्रपटाच्याबरोबरीने बॉलिवूडमध्येदेखील पदार्पण केले आहे. नुकताच तिचा ‘मिशन मजनू’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिचे चाहते आता पुढील चित्रपटाची वाट बघत आहेत.