‘इंडियन आयडल’ या रियालिटी शोमधून घराघरात पोहचलेला तसेच ‘इंडियन आयडल’च्या १० व्या सिजनचा विजेता असलेला सलमान अली हा लोकप्रिय गायक आहे. सलमानने ‘मजनू’ या मराठी चित्रपटासाठी प्रथमचं मराठीत पार्श्वगायन केले आहे. या चित्रपटात मराठी गाणं गातानाचं अनुभवर शेअर केला आहे.
“प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणाऱ्या ‘मजनू’ चित्रपटासाठी गाण्याचा अनुभव खूप छान होता. जन्मभूमी हरियाणा असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव असल्याने मराठी भाषेची मला गोडी लागली. मराठी चित्रपटात मला गायची इच्छा होती ती ‘मजनू’ चित्रपटामुळे माझी पूर्ण झाली” असे सलमान अली म्हणाला.
आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, नावाचा अर्थ माहितीये का?
आणखी वाचा : शनिदेव करणार मार्गक्रमण, या ४ राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा
“मन बांधलं बांधलं, तुझ्या नावाचं तोरण” असे गाण्याचे बोल आहेत. तर हे गीत गोवर्धन ‘दोलताडे यांनी लिहले असून संगीतबद्ध पी. शंकरम् यांनी केले आहे. तर अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री श्वेतलाना अहिरे यांच्यावर नाशिक येथील कळवण, सापुतारा अशा नयनरम्य परीसरात चित्रित झाले आहे. साऊथचे कॅमेरामन एम. बी. अलीकट्टी हे असून नृत्य दिग्दर्शक साऊथचे हाईट मंजू हे आहेत.
आणखी वाचा : दिवसाला १०० सिगारेट आणि ३० कप ब्लॅक कॉफी शाहरुखने केला होता त्याच्या व्यसनाबद्दल खुलासा
चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे आहेत. शिवाजी दोलताडे म्हणाले, की प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला ‘मजनू’ समजतो जे लोक चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ‘मजनू’ चित्रपटात रसिकांना सस्पेंस, एक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत. हा चित्रपट तरुणाईच्या ह्रदयाचा ठाव घेईल असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले.