छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल १२.’ हा शो सुरु झाल्यापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी स्पर्धकांमुळे तर कधी परीक्षकांमुळे हा शो चर्चेचा विषय ठरतो. गेल्या काही दिवसांपासून शोवर जोरदार टीका होत आहे. आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रिअ‍ॅलिटी शोला ‘डेली सोप’ बनवल्याचे म्हटले आहे.

शनिवारी ‘इंडियन आयडल १२’मध्ये फादर्स डे विशेष एपिसोड होता. शोमधील स्पर्धकांनी त्यांच्या वडिलांसाठी गाणी गायली होती. दरम्यान स्पर्धक आणि परीक्षक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पण हा एपिसोड पाहून नेटकऱ्यांनी शोवर टीका केली आहे. अनेकांनी ट्वीट करत ‘हा ड्रामा आता बंद करा’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘प्रेग्नंट असताना लग्नाच्या अनेक ऑफर्स आल्या पण…’, नीना गुप्ता यांचा खुलासा

एका यूजरने थेट ट्वीट करत रिअ‍ॅलीटी शोला डेली सोप बनवले असल्याचे म्हटले आहे. ‘सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो पेक्षा इंडियन आडयल एक डेली सोप झाला आहे’ असे एका यूजरने म्हटले आहे.

दरम्यान, ‘इंडियन आयडल १२’ मध्ये हिमेश रेशमीयासोबत नेहा कक्कड आणि विशाल दादलानी परीक्षक आहेत. काही दिवसांपूर्वी अनु मलिक, सोनू कक्कर आणि मनोज मंतुशिर हे परीक्षकांची जागा सांभाळत होते. पण आता हिमेश शोमध्ये परतल्याचे दिसत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘इंडिय आयडच्या १२’ पर्वामुळे शो चा सुत्रसंचालक आदित्य नारायण बऱ्याच वेळा ट्रोल झाला आहे.

Story img Loader