छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ आजवर या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गायकांचे शोने संपूर्ण आयुष्य बदलले. इंडियन आयडल ही स्पर्धा जिंकणारे गायक सध्या चांगलेच लोकप्रिय आहे. इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. अभिजीत सावंतचे आयुष्य रातोरात बदलले होते. मात्र आता अभिजित सावंतच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
अभिजीत सावंत हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो कायमच त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच अभिजीत सावंतने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत त्याने एक मत मांडलं आहे.
आणखी वाचा : “आर्थिक मंदीदरम्यान…” ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांबद्दल अभिजीत सावंतने केला खुलासा
“मी सध्या फक्त माझ्या स्वप्नांसाठी जिवंत आहे. नाहीतर माझे हे जीवन कधीच संपले असते”, असे अभिजीत सावंतने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याच्या या पोस्टमुळे सध्या तो चर्चेत आला आहे. त्याने ही पोस्ट नेमकी का केली? यामागचे कारण काय? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/02/abhijeet-sawant-post.jpg?w=305)
आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती
दरम्यान अभिजीत इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यानंतर त्याला काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. सध्या तो लाइमलाइटपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. “मी इंडियन आयडलचा विजेता ठरल्यानंतर अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनी माझी स्तुती केली होती. ती ऐकून मी भारावून गेलो होतो. त्यावेळी लोकांकडून मिळालेलं प्रेम, आंनद यातून काही दिवसांनी सावरणं गरजेचं होतं. मी या इंडस्ट्रीतून गायब कधीच झालो नव्हतो. पण मी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही.” असे त्याने मागे एका मुलाखतीत म्हटले होते.