सोनी  वाहिनीवरील इंडियन आयडॉल या स्पर्धेतील दुसऱ्या पर्वाचा विजेता गायक संदीप आचार्य याचा आज (रविवार) येथील मेंदांता रुग्णालयामध्ये अकाली मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. त्यांच्या मागे त्याची पत्नी आणि एक महिन्याची मुलगी आहे.
संदीप आचार्य हा मुळचा राजस्थानचा. गेल्या पंधरा दिवसांपासून तो कावीळ झाल्याने आजारी होता. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. बिकानेर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, संदीप आचार्यच्या अचानक जाण्याने संगीत जगताला मोठा धक्का बसला आहे. संदीप आचार्यचं निधन? अरे देवा… असं कसं झालं… कुणाला कारण माहित आहे का?, अशी प्रतिक्रिया सोनू निगम याने ट्विटरवरून दिली आहे.

Story img Loader