युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गदारोळ झाल्यानंतर कॉमेडियन समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोचे सर्व एपिसोड डिलीट केले आहेत. रणवीरने आक्षेपार्ह विधान केलं, तेव्हा या शोमध्ये आशिष चंचलानी व अपूर्वा मुखिजा हे दोघेही पाहुणे म्हणून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी अपूर्वाची चौकशी केली, तसेच तिचा जबाब नोंदवला. त्यानंतर ती बुधवारी एका कार्यक्रमात पोहोचली होती.
रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला आई-वडिलांच्या प्रायव्हसीवरून आक्षेपार्ह प्रश्न विचारला, ती व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अनेक राजकीय नेत्यांनी व सेलिब्रिटींनी या वक्तव्याचा निषेध केला. अनेकांनी रणवीर अलाहाबादिया, समय रैना व शोमधील इतरांविरोधात तक्रारी दाखल झाल्या. यात अपूर्वा मुखिजाचाही समावेश आहे. या वादग्रस्त एपिसोडप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पहिल्यांदाच एका इव्हेंटला गेली होती. तिचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
अपूर्वा काळ्या रंगाचे रिलिव्हिंग टॉप व स्कर्ट साइड स्लिट स्कर्ट घालून या इव्हेंटला आली होती. तिचा हा लूक पाहून तिला ट्रोल केलं जात आहे.
पाहा व्हिडीओ
काहींनी तिला प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करणारी मुलगी म्हटलं आहे. तर काहींनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. ‘कलेशी औरत’ मर्यादा संस्कृती व धर्मापासून दूर, असं एका युजरने म्हटलं आहे. हिच्यामुळे शो बंद झाला, अशी कमेंटही एका युजरने केली आहे.
![apoorva mukhija2](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/apoorva-mukhija2.jpg?w=346)
![apoorva mukhija](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/apoorva-mukhija-3.jpg?w=330)
![apoorva mukhija](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/apoorva-mukhija-1.jpg?w=347)
‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये नेमकं काय घडलं?
रणवीर स्पर्धकाला म्हणाला, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?” यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत.
अपूर्वा व आशिष यांनी पोलिसांना काय सांगितलं?
इंडियाज गॉट लेटेंट हा शो स्क्रिप्टेड नव्हता. या शोमध्ये जे जजेस सहभागी होतात त्यांना कुठलाही मोबदला किंवा मानधन दिलं जात नाही. सोशल मीडियावर हा कंटेट पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य आहे. या शोसाठी तिकिटं असतात त्यातून विजेत्याला बक्षीस दिलं जातं, असं पोलिसांना अपूर्वा व आशिष यांनी सांगितलं.