मागच्या महिन्यात ऑस्कर २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आले. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’, ‘आरआरआर’, ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ अशा काही चित्रपटांपैकी एक चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये पाठवला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. पण या चित्रपटांना मागे टाकत ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाने ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत बाजी मारली. ‘छेल्लो शो’चा इंग्रजी अनुवाद ‘द लास्ट शो’ असा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांनी केले आहे. त्यांच्या ‘संसारा’, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. सिद्धार्थ रॉय कपूर, धीर मोमाया आणि पॅन नलिन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. गुजरातमधील सौराष्ट्र या भागातल्या एका खेड्यातली ही गोष्ट आहे. या खेड्यामध्ये राहणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. दरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – “माझे नाव कधीही…” अमिताभ बच्चन यांनी स्वत: सांगितला नावामागे दडलेला किस्सा

‘छेल्लो शो’ येत्या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता निर्मात्यांनी हा चित्रपट १३ ऑक्टोबरच्या रात्री प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. दिग्दर्शन पॅन नलिन यांनी या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी “सरप्राईज, तुमच्यासाठी आम्ही हा चित्रपट एक दिवस आधी १३ ऑक्टोबरला घेऊन येत आहोत. ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताची प्रवेश साजरा करत देशभरातील ९५ चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दिवसातला (१३ ऑक्टोबर) ‘शेवटचा शो’ ९५ रुपयांमध्ये पाहता येणार आहे.” असे लिहिले आहे.

आणखी वाचा – शुभमन गिलने ‘वेधा’च्या सिग्नेचर स्टाइलमध्ये केलं इशान किशनचं कौतुक; हृतिक रोशन कमेंट करत म्हणाला…

छेल्लो शोचा अर्थ ‘शेवटचा शो’ असल्यामुळे हा कल्पक निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. ९५ वा अकादमी पुरस्कार सोहळा १२ मार्च २०२३ रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस या शहरात संपन्न होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias oscar entry last film show to open in 95 cinemas at a price of rs 95 yps
Show comments