भारताच्या नीला वासवानी यांना मलाला युसुफझाईवर आधारित असलेल्या ‘आय अॅम मलाला’ या ‘ऑडिओ बुक’ आणि संगीतकार रिकी केजला ‘विंड्स ऑफ संसार’ साठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज ‘५७वा ग्रॅमी पुरस्कार’ सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला.
मुळचा बंगळुरुचा असलेल्या रिकी केजला ‘विंड्स ऑफ संसार’साठी ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने हा अल्बम आफ्रीकी बासुरीवादक वूंटर केलरमैनच्या साथीने तयार केला होता. नीला वासवानी यांना ‘आय अॅम मलाला: हाउ वन गर्ल स्टूड फोर एज्युकेशन अॅण्ड चेंन्ज दि वर्ल्ड (मलाला युसूफजई)’ यासाठी ‘बेस्ट चिल्ड्रन अल्बम’ श्रेणीचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. हा अल्बम म्हणजे ‘आय अॅम मलाला’ या पुस्तकाचे ‘ऑडिओ बुक’ रुपांतरण असून त्यास नीला वासवानी यांनी आवाज दिला आहे.
भारताच्या नीला वासवानी आणि रिकी केज ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित
भारताच्या नीला वासवानी यांना मलाला युसुफझाईवर आधारित असलेल्या 'आय अॅम मलाला' या 'ऑडिओ बुक' आणि संगीतकार रिकी केजला ‘विंड्स ऑफ संसार’ साठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
First published on: 09-02-2015 at 04:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias ricky kej neela vaswani grab grammys