भारताच्या नीला वासवानी यांना मलाला युसुफझाईवर आधारित असलेल्या ‘आय अॅम मलाला’ या ‘ऑडिओ बुक’ आणि संगीतकार रिकी केजला ‘विंड्स ऑफ संसार’ साठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज ‘५७वा ग्रॅमी पुरस्कार’ सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला.
मुळचा बंगळुरुचा असलेल्या रिकी केजला ‘विंड्स ऑफ संसार’साठी ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने हा अल्बम आफ्रीकी बासुरीवादक वूंटर केलरमैनच्या साथीने तयार केला होता. नीला वासवानी यांना ‘आय अॅम मलाला: हाउ वन गर्ल स्टूड फोर एज्युकेशन अॅण्ड चेंन्ज दि वर्ल्ड (मलाला युसूफजई)’ यासाठी ‘बेस्ट चिल्ड्रन अल्बम’ श्रेणीचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. हा अल्बम म्हणजे ‘आय अॅम मलाला’ या पुस्तकाचे ‘ऑडिओ बुक’ रुपांतरण असून त्यास नीला वासवानी यांनी आवाज दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा