वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
नवलाई
सिनेमा बघण्याचा अनुभव दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध कसा होत चालला आहे, याचं उदाहरण म्हणजे आयनॉक्सने अलीकडेच मुंबईत मालाड येथे इनऑर्बिट मॉलमध्ये सुरू केलेले ‘मेगाप्लेक्स’. सिनेमा बघण्याचा अनुभव अत्यंत सुखद, आरामदायी व्हावा असं वाटत असेल तर मेगाप्लेक्सने त्यासाठीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आयनॉक्सचा तर असा दावा आहे की, सिनेमा पाहण्यासाठी जास्तीत जास्त फॉरमॅट तसेच सेवा उपलब्ध करून देणारे हे जगातले पहिले मल्टिप्लेक्स आहे.
त्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आकार. आयनॉक्सचं आजवरचं हे सगळ्यात मोठं मल्टिप्लेक्स ६० हजार चौरस फुटांहून अधिक मोठं आहे. त्याची आसनक्षमताच एक हजार ५८६ इतकी आहे. या मेगाप्लेक्समध्ये दररोज ६० शो दाखवण्याची आणि सहा हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे घरबसल्या जगातील उत्तमोत्तम सिनेमे, वेबसीरिज बघणाऱ्या आजच्या प्रेक्षकाला सिनेमा थिएटपर्यंत खेचून आणणं हे आव्हानच आहे. त्यासाठी काय काय करता येईल याचा बारकाईने विचार करून हे मेगाप्लेक्स तयार करण्यात आले आहे. अत्यंत भव्य असा स्क्रीन, फोर डीचा अनुभव, मोजक्या लोकांसाठी अत्यंत आरामदायी थिएटर, लहान मुलांना आवडेल अशी अतिशय आकर्षक रंगसंगती, सुंदर रचना असलेलं थिएटर कुणाच्या घरी असू शकत नाही. अशा सगळ्या रचनांमध्ये, दिमाखदार थिएटरमध्ये, मित्रमंडळींसह आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेत सिनेमा बघण्यासाठी सिनेमाप्रेमींची पावलं थिएटरकडे वळावीत हा उद्देश या मेगाप्लेक्समध्ये सफल होतो. ते ‘लक्झरी’, ‘सेवा’ आणि ‘तंत्रज्ञान’ यांचे प्रतीक असून सगळ्या वयोगटांतील प्रेक्षकांना सिनेमाचा वेगळा अनुभव देणारे आहे.
इनसिग्निया : (INSIGNIA) :
लेदर रिक्लायनर, बटलर ऑन कॉल, लेसर प्रोजेक्शन व लाइव्ह किचनची सेवा असणारे डायनिंग कॅटलॉग अशी सेवा देऊन प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचा आलिशान अनुभव देणारा आयनॉक्सचा सेव्हन स्टार फॉरमॅट.
किडल्स : प्रामुख्याने छोटय़ा प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या या फॉरमॅटमध्ये आकर्षक व ठसठशीत आसने व अंतर्गत सजावट आहे. तसेच, त्यामध्ये लॉबी असून तेथे बालकांना मौजमस्ती करता येऊ शकते.
स्क्रीनएक्स (ScreenX) : जगातील पहिले मल्टि-प्रोजेक्शन तंत्रज्ञान. यामध्ये २७० अंश पॅनोरॅमिक पद्धतीने सिनेमा पाहता येतो. ऑडिटोरिअममधील तीन भिंतींवर प्रोजेक्शन केले जाते.
मॅक्स फोर डी (MX4D): या फॉरमॅटमध्ये अतिशय आधुनिक पद्धतीने सिनेमाचा अनुभव घेता येतो. आसने व थिएटरच्या भिंती यामध्ये असलेल्या १४ बिल्ट-इन मोशन्स आणि इफेक्टमुळे प्रेक्षकांना पडद्यावरील दृश्यांचा अद्वितीय अनुभव घेता येतो.
आयमॅक्स (IMAX): सिनेमाचा जगातील सर्वात उत्कृष्ट अनुभव. हृदयाची धडधड वाढवणारा ऑडिओ, ४० टक्के मोठे चित्र, डय़ुएल प्रोजेक्शन सिस्टीम, सर्वोच्च गुणवत्ता असणारे थ्रीडी तसेच आकर्षक अंतर्गत भाग.
सॅमसंग ओन्ली एक्स एलईडी : जगातील पहिले सिनेमा एलईडी तंत्रज्ञान, दहापट अधिक ठळक व्हिज्युअल्स तसेच जेबीएलचा सराऊंड साऊंड.
मेनस्ट्रीम ऑडिटोरिअममधील डॉल्बी अॅटमॉस (ATMOS) साऊंड व लेसर प्रोजेक्शन यामुळे सिनेमाचा परिपूर्ण अनुभव मिळतो.
सिनेमा बघताना काही तरी खायला तर हवंच. त्याशिवाय सिनेमाची लज्जत वाढत नाही असं अनेकांना वाटतं. त्यासाठीची खास व्यवस्था मेगाप्लेक्सने केली आहे. त्यासाठीच्या मेन्यूमध्ये भारतीय, लेबनीज, अमेरिकन, ओरिएंटल, इटालियन, ग्रिल तसेच थाय अशा पर्यायांचा समावेश आहे. तसेच विविध प्रकारची पेये, पॉपकॉर्न आणि नाचो यांचेही प्रकार आहेत. इनसिग्नियामध्ये तर लाइव्ह किचनमधून सादर केलेल्या इन-सिनेमा डायनिंगपासून ऑनिक्स डिनर या मल्टिप्लेक्समधील सिंगल सव्र्ह बफेपर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. कॅफे अनविंड हा आणखी एक पर्याय असून त्यामध्ये कॉफी, डिटॉक्स ज्युस, बर्गर, सॅण्डविच, आइस्क्रीम तसेच वॅफल यांची उपलब्धता असेल. किडल्स लाऊंजच्या काऊंटरवर बच्चे कंपनीला आवडतील असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे काऊंटर काही निवडक फूड ब्रॅण्ड चालवणार असून त्यामध्ये १२ प्रकारे क्युझेन आणि २५० प्रकारचे पदार्थ आहेत.
मेगाप्लेक्सने पाच भव्य लॉबींमध्ये उत्सवी आलिशान अनुभव देण्यासाठीची वातावरणनिर्मिती केली आहे. सोनेरी रंगाच्या गिल्डेड पाइपासून तयार केलेल्या इन्स्टॉलेशनने इथल्या वातावरणात भर घातली आहे.
याविषयी बोलताना, आयनॉक्स ग्रुपचे संचालक सिद्धार्थ जैन सांगतात, ‘‘मेगाप्लेक्स ही केवळ भारतीय सिनेमातील समृद्ध लॅण्डस्केपसाठीच नाही, तर जागतिक स्तरासाठीही मोठी झेप आहे. जगातील सर्वात मोठे फॉरमॅट असणारे मल्टिप्लेक्स म्हणून, मेगाप्लेक्सने जागतिक सिनेमा व्यवसायातील आयनॉक्सचे स्थान बळकट केले आहे. हे अत्यंत आकर्षक मेगाप्लेक्स म्हणजे सिनेमाप्रेमींनी एकदा तरी भेट द्यावीच, असे मुंबईतील ठिकाण आहे.’’
आयनॉक्स लिजर लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक टंडन सांगतात, ‘‘मुंबईमध्ये मेगाप्लेक्स दाखल करणे, हा आमच्यासाठी व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचा व दूरगामी मैलाचा दगड आहे. येथे इतक्या मोठय़ा स्वरूपामध्ये मनोरंजनाचा अनुभव मिळणार आहे. हे मेगाप्लेक्स प्रेक्षकांबरोबरचे आमचे नाते अधिक गहिरे करणारे आहे आणि त्यांना भव्य व जागतिक फॉरमॅट उपलब्ध करणारे आहे.’’
आयनॉक्स लिजर लिमिटेड
आयनॉक्स लिजर लिमिटेड (आयनॉक्स) हा भारतातील सर्वात मोठय़ा मल्टिप्लेक्स साखळीपैकी एक असून ६८ शहरांमध्ये कंपनीचे १४४ मल्टिप्लेक्स आणि ५९८ स्क्रीन आहेत. आयनॉक्सने भारतीय प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचा सेव्हन स्टार अनुभव देऊ केला आहे. प्रत्येक आयनॉक्स प्रॉपर्टीमध्ये वैशिष्टय़पूर्ण आर्किटेक्चर तसेच शैली आहे. आयनॉक्सने आयनॉक्स लेसरप्लेक्स, आयमॅक्स व आयनॉक्स ओन्लीएक्स याद्वारे नवे प्रोजेक्शन आणि ऑडिओ तंत्रज्ञान सादर केले आहे. आलिशान मायक्रो अॅडजस्टेबल लेदर रिक्लायनर्स, बटलर ऑल कॉल सुविधा, सेलिब्रेटी शेफकडून गॉरमेट मील पर्याय, डिझायनर स्टाफ युनिफॉर्म ही या मल्टिप्लेक्सची काही वैशिष्टय़े आहेत.
- एकाच ठिकाणी जास्तीत जास्त सेवा व तंत्रज्ञानावर आधारित फॉरमॅट उपलब्ध करणारे जगातील पहिलेवहिले मल्टिप्लेक्स
- ११ स्क्रीन आणि पाच भव्य लॉबी, ६० हजारांहून अधिक चौरस फूट क्षेत्र असणारे, एक हजार ५८६ आसने.
- आयनॉक्सचे आजवरचे सर्वात मोठे ‘मेगाप्लेक्स’
- ११ स्क्रीनमुळे मेगाप्लेक्समध्ये दररोज ५० ते ५५ शो दाखवणे शक्य.
सौजन्य – लोकप्रभा