विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा काल म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. तिच्या कुटुंबासोबत ऐश्वर्याने तिचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. एका फोटोत ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत दिसत आहे. ऐश्वर्या आणि आराध्याने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर अभिषेकने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या तिची आई आणि आराध्यासोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करत माझं कायम तुमच्यावर प्रेम असेल असे कॅप्शन देत ऐश्वर्याने सगळ्यांचे आभार मानले आहे.
आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ
काल १ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याने ४८ वा वाढदिवस साजरा केला आहे. तर पत्नी ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिषेकने एक पोस्ट शेअर केली होती. हा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाइफ असं कॅप्शन अभिषेकने दिलं आहे. ऐश्वर्या ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.