दिल्लीतील जहांगीरपुरी भागात एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या गुरुवारी सांगितले की जे आरोपी आहेत ते पुष्पासारखे गुन्हेगारीवर आधारित चित्रपट पाहून प्रभावित झाले आहे. त्यांना गुन्हेगारीच्या जगात प्रसिद्ध व्हायचे होते. या हत्येतील आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हत्याकेल्यानंतर एक व्हिडिओही बनवला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी जहांगीरपुरी पोलिसांना बाबू जगजीवन राम मेमोरियल हॉस्पिटलमधून माहिती मिळाली की एका व्यक्तीच्या पोटात वार करण्यात आला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ज्या मुलाची हत्या झाली तो २४ वर्षांचा होता.
आणखी वाचा : …म्हणून अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ बनली मराठी व्यक्तीरेखा; श्रेयस तळपदने केला खुलासा
पोलिस उपायुक्त (उत्तर पश्चिम) उषा रंगनानी यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजवरून मृत आणि आरोपींमध्ये भांडण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी त्यांच्या गॅंगला बदनाम गँग असे नाव दिले होते. त्यानंतर आरोपींना पकडण्यात आले. पुष्पा आणि भौकालसारखे चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये चित्रित केलेल्या गुंडांच्या जीवनशैलीचा त्यांच्यावर प्रभाव असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.