अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. प्रेक्षकांनी हा चित्रपट, यातील संवाद गाणी सगळंच उचलून धरलं. यासंदर्भात वेगवेगळी रील्सदेखील व्हायरल झाली. य सगळ्याबरोबरच समांथा रूथ प्रभूचं यातील आयटम नंबरही चांगलंच गाजलं. ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगमधून समांथाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. या गाण्याला आणि या गाण्यातील तिच्या नृत्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या गाण्यामुळे तिला नवी ओळख मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता ‘पुष्पा २’ची सर्वत्र चर्चा आहे. नुकताच याचा टीझरही प्रदर्शित झाला ज्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या दुसऱ्या भागातही समांथाचं आयटम साँग पाहायला मिळणार की तिची जागा कुणी दुसरी अभिनेत्री घेणार यावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. ‘पुष्पा २’मध्ये समांथा ऐवजी सीरत कपूरचं आयटम साँग पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

आणखी वाचा : ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’बद्दल एसएस राजामौली यांचा मोठा खुलासा; १० भागांमध्ये बनवणार चित्रपट

आता मात्र सीरतने स्वतः याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. नुकतंच सीरत अल्लू अर्जुनला भेटली. त्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने हि चर्चा रंगली होती, पण ‘पुष्पा २’मध्ये सीरत नसेल हा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच केला आहे. याविषयी सोशल मीडियावर पोस्ट करत सीरतने सांगितलं, “या सगळ्या अफवांना कसलाही आधार नाही. मी माझा मित्र अल्लू अर्जुनला भेटले हे खरं आहे, आम्ही सहज भेटलो आणि सेल्फी काढला. मी ‘पुष्पा २’मध्ये कोणतीही भूमिका किंवा आयटम साँग करणार नाहीये. तुमची इच्छाशक्ति चांगली आहे, पण अशा खोट्या बातम्या पसरवू नका ही मी विनंती करते. मी माझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती देईन.”

फोटो : सोशल मिडिया

२०२१ मध्ये आलेल्या ‘पुष्पा’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. चंदन तस्करीच्या विश्वातील पुष्पाची कहाणी लोकांना भावली. आता या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा – द रुल’ हा चित्रपट यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यामध्ये अल्लू अर्जुन, फहाद फाजील, रश्मिका मंदाना यांच्याबरोबरच साई पल्लवीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instead of samantha ruth prabhu which actress will perform item song in pushpa 2 avn