चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिलं जातं. हरहुन्नरी अभिनेता, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अतरंगी गायक अशी किशोर कुमार यांची ओळख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिकारी’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरूवात केली होती. यामध्ये त्यांचे जेष्ठ बंधू अशोक कुमार यांनी मुख्य भूमिका साकारली होती. किशोर कुमार लहान असतानाच अशोक बॉलिवूडमध्ये अभिनेते म्हणून प्रसिद्धीस येऊ लागले होते. अशोक यांच्या मदतीने नंतर अनूप यांनीसुद्धा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यामुळे लहानपणापासूनच किशोर कुमार यांना चित्रपट आणि संगीतात आवड निर्माण झाली.

किशोर कुमार यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये मोहम्मद रफी यांनी त्यांना आवाज दिला होता. विशेष म्हणजे ‘रागिनी’ आणि ‘शरारत’ या चित्रपटांमध्ये किशोर कुमार यांना दिलेल्या आवाजासाठी रफींनी फक्त एक रुपया मानधन घेतलं होतं.

PHOTOS : लातूरची निशा पोहोचली डिस्नेलँडच्या अनोख्या दुनियेत

१९४८ मध्ये ‘जिद्दी’ या चित्रपटात किशोर कुमार यांना पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्यांनी देव आनंद यांच्यासाठी गाणं गायलं होतं. चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध गाणी गायली. हिंदी भाषेसोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत.