इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अ‍ॅवार्ड्स (आयएमएफएफए)चा यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत हाँगकाँग येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे खास वैशिष्टय़ म्हणजे भर समुद्रातील भव्य जहाजावर (स्टार क्रुझवर) पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.
२० सप्टेंबर रोजी हाँगकाँग येथे कार्यक्रमाची सुरुवात होऊन नंतर ही बोट चीन आणि व्हिएतनाम येथे जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपट आणि कलाकारांना नेणे आणि तेथील प्रेक्षकांना मराठी चित्रपटांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ए. एम. एंटरटेन्मेंट अ‍ॅण्ड ब्रॉडकॉस्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक चिदंबर रेगे, निलेश कुलकर्णी, भास्कर अय्यर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर हे आयोजक मंडळाचे सदस्य असून अमोल गुप्ते, रवी जाधव, महेश लिमये, संयज जाधव हे ‘आयएमएफएफए’च्या सल्लागार मंडळावर सदस्य आहेत. २७ ऑगस्टपर्यंत विविध पुरस्कार आणि नामांकनांची घोषणा केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा