संस्कृत भारती या संस्थेतर्फे यंदा गोव्यात आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन जानेवारी २०२५ मध्ये करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्कृत भाषा ही समाजातील संवादाची माध्यमभाषा व्हावी म्हणून संस्कृत भारती ही संस्था १९८१ पासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून संस्कृत भारतीने सहा वर्षांपूर्वी जगातील आबालवृद्धांना भुरळ घालणाऱ्या दृकश्राव्य माध्यमाची निवड केली आणि आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुचित्रपट महोत्सव आणि स्पर्धेचे आयोजन सुरू केले. या लघुचित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक कलाकारांबरोबरच हौशी कलाकारही यात सहभागी होऊ शकतात. अट फक्त एकच- लघुचित्रपटातील संवादाची भाषा संस्कृत असावी. या महोत्सवाच्या निमित्ताने संस्कृत लघुचित्रपटांची स्पर्धा घेतली जाऊन त्यात उत्कृष्ट लघुचित्रपटाबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शक, कलाकार, संगीत इत्यादी विविध प्रकारची पारितोषिके देण्यात येतात. जगभरातून या महोत्सवासाठी संस्कृत लघुचित्रपटांची नोंदणी होत असते.

हेही वाचा >>> “केदार सर माझ्यासाठी देव, त्यांनी मुलगा मानलंय…”, सूरज नवा फोन घेतल्यावर ‘या’ नावाने सेव्ह करणार केदार शिंदेंचा नंबर

आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाबरोबरच जगभरातील तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या यूट्यूब रिल्स/ यूट्यूब शॉर्ट्सची स्पर्धा- हो, ‘संस्कृत यूट्यूब रिल्स/ यूट्यूब शॉर्ट्स’ची स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली आहे. या वर्षी हा महोत्सव २४ जानेवारी २०२५ रोजी गोव्यामध्ये होणार आहे.

या दोन्ही स्पर्धांचा निकाल आणि पारितोषिक वितरण २४ जानेवारी २०२५ रोजी महोत्सवाच्या ठिकाणी होईल. या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा शेवटचा दिवस ५ नोव्हेंबर २०२४ आहे. अधिक माहितीसाठी http://www.samskritsbharat.in या संकेतस्थळाद्वारे तसेच ९७६९५४५७५८ या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.

संस्कृतमध्ये लघुचित्रपट तसेच यूट्यूब रिल्स/ यूट्यूब शॉर्ट्स तयार करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.