छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई.’ अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील शुभ्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील शुभ्रा ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली होती. तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर फारच सक्रीय असते. काल जागतिक महिला दिनानिमित्त तेजश्री प्रधानने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिलांचे कर्तृत्व आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. महिला दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेक कलाकार शुभेच्छा देताना दिसत आहे. याच निमित्ताने तेजश्री प्रधानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.

“माझ्या कोणत्याही निर्णयावर मी खंत व्यक्त करत बसत नाही किंवा माझ्यासोबत कोणालाही काही वाईट करू देत नाही. जर मी पडले तर मी त्यातून सावरेन आणि खंबीरपणे उभी राहीन याची मला खात्री आहे. माझ्या आयुष्यावर माझा पूर्ण ताबा आहे आणि मी साध्य करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही”, असे तेजश्रीने म्हटले आहे. दरम्यान तेजश्रीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

‘झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले “जर तक्रार असेल तर…”

आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेमुळे ती खरी प्रसिद्धीझोतात आली. आजही ही मालिका प्रेक्षक विसरलेले नाहीत. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International women day actress tejashree pradhan share motivational post on instagram nrp