International Yoga Day 2023 : आंतरराष्ट्रीय योग दिन आज जगभरात साजरा केला जात आहे. नियमित योग करणं शारीरिक स्वास्थ्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं. याचीच जाणीव करुन देणारा हा दिवस. योग दिनानिमित्त आज सेलिब्रिटी मंडळी योगाचे विविध प्रकार करतानाचे व्हिडीओ व फोटो शेअर करताना दिसत आहे. आता सेलिब्रिटी मंडळीं पाठोपाठ राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही योगा करतानाचे व्हिडीओ व फोटो शेअर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही विविध योगाचे प्रकार करतानाचे फोटो इन्स्टाग्रामद्वारे शेअर केले आहेत. तसेच सगळ्यांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण फोटो शेअर केल्यानंतर अमृता यांना त्यांच्या कपड्यांवरुन तसेच फोटोंवरुन ट्रोल करण्यात येत आहे.

आणखी वाचा – Video : एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार, तरीही दमली नाही प्राजक्ता माळी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हा पुरावा…”

अमृता यांनी योगा करतानाचे फोटो शेअर करत म्हटलं की, “तुम्ही कितीही व्यग्र असाल, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरी शरीर व मनाच्या उत्तम आरोग्यासाठी योग करणं विसरु नका”. ही खास पोस्ट शेअर करत त्यांनी सगळ्यांना योद दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अगदी कमी शब्दांमध्ये योगाचं महत्त्व पटवून दिलं.

आणखी वाचा – Lust Stories 2 Trailer : इंटिमेट सीन्स, बोल्ड संवाद अन्…; ‘लस्ट स्टोरी २’चा ट्रेलर पाहिलात का? नीना गुप्ता यांच्या डायलॉगची जोरदार चर्चा

अमृता फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देतात तसेच विविध योग प्रकार करतात हे पाहून त्यांचं अनेकांनी कौतुक केलं. तर काहींना त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका फोटोमध्ये त्या जीभ बाहेर काढून पोझ देत आहेत. यावरुन अनेकांनी त्यांना तुम्हाला जीभ बाहेर काढण्याची काय गरज? असं म्हटलं. तर काहींनी त्यांना ड्रेसिंगवरुन साप म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International yoga day 2023 devendra fadnavis wife amruta fadnavis yoga poses gets trolled see details kmd