आयपीएलच्या ११ व्या हंगामाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. आता या महाकुंभात सहभागी झालेल्या संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. रविवारीही आयपीएलच्या या रणांगणात शाहरुख खानच्या कोलकाला नाईट रायडर्स संघाचा तुफानी खेळ पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळाली. सुनील नरीनची फटकेबाजी आणि नितीश राणा- दिनेश कार्तिक यांच्यातील भागीदारी या साऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिल्याच सामन्यात पराभव केला. कोलकात्यातील इडन गार्डन्स येथे पार पडलेल्या या सामन्यात खेळाडूंची खेळी पाहाण्यासाठी उपस्थितांमध्ये उत्साह होताच. पण, या उस्ताहाचं आणखी एक कारणही होतं. ते कारण म्हणजे किंग खानची उपस्थिती. आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणून शाहरुख नेहमीप्रमाणेच यंदाही मैदानात उपस्थित होता. यावेळी त्याचा उत्साह ओसंडून वाहतानाही पाहायला मिळालं. पण, यावेळी बी- टाऊनच्या या रोमँटिक हिरोला कोणीतरी पिछाडीवर टाकलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य म्हणजे मैदानात शाहरुखपेक्षा त्याच एका व्यक्तीची चर्चा होत होती. किंग खानला स्पर्धा देणारी ती व्यक्ती कोण, असाच प्रश्न तुमच्याही मनात घर करतोय ना? ती व्यक्ती म्हणजे शाहरुखची मुलगी सुहाना खान. तिच्या उपस्थितीमुळे एका अर्थी मैदानात चाहत्यांची मनं क्रिकेटर्सच्या खेळीने नव्हे, तर सुहानाच्या उपस्थितीने जिंकली असंच म्हणावं लागेल. सध्या सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चांनीही जोर धरला आहे. त्यामुळे एका अर्थी कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वीच तिचा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, सुहाना आणि शाहरुख दोघांनीही आपल्या संघाला पहिल्या क्षणापासून ते अगदी शेवटपर्यंत प्रोत्साहन दिल्याचं पाहायला मिळालं.

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र

शाहरुखचा उत्साह आणि केकेआरमधील खेळाडूंची सामन्यावर असणारी पकड या जोरावर खऱ्या अर्थाने किंग खानच्या संघाने आयपीएलचा श्रीगणेशा केला आहे. तेव्हा आता संघातील खेळाडूंचा हा फॉर्म कायम रहावा अशी शाहरुखची इच्छा असणार यात शंकाच नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 bollywood actor shah rukh khans daughter suhana steals the show at kolkatas eden gardens watch video