बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानची लेक इरा खान सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. इराने नुकतेच आमिरसोबत काही फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मात्र, एका नेटकऱ्याने इराला चक्क तिचे आणि आमिरचं काय नात आहे असा प्रश्न केला होता. यावर इराने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. इराने तिच्या पोस्टवर असलेल्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. यात एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तो तुझ्या इतका जवळ उभा कसा? तुझा नातेवाईक आहे का?’ त्यावर एका चाहत्याने उत्तर दिलं, ‘ते तिचे वडील आहेत.’ दुसरा चाहता म्हणाला, ‘ती आमिर खानची मुलगी आहे, तू गुगलवर तपासून पाहू शकतोस.’ यावर आणखी एक नेटकरी म्हणाला, अरे गुगल कधी खोटंसुद्धा सांगू शकतं. अनेकदा असं झालंय की आपण एखादी गोष्ट सर्च करतो आणि गुगल मात्र दुसरचं उत्तर सांगतो. नेटकऱ्यांच्या या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत इरा म्हणाली, हे काहीतरी नवीन आहे. पण खरचं तुम्ही गुगलवर जे काही वाचता त्यावर विश्वास ठेवू नका.

आणखी वाचा : तैमूरच्या फोटोवर कंगनाची कमेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…

आणखी वाचा : लेकीचे केस पांढरे का? दिलीप जोशी म्हणाले…

इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. इराला जुनैद हा भाऊसुद्धा आहे. आमिर आणि रिना २००२ मध्ये विभक्त झाले. इराने २०१९ मध्ये नाटकाचं दिग्दर्शन करत कलाविश्वात पदार्पण केले होते. इराला कॅमेऱ्यासमोर नाही तर कॅमेऱ्यामागे राहून काम करायला आवडतं.

Story img Loader