आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरीच फॅन फॉलोइंग आहे. आयरा आपल्या पर्सनल लाइफसोबतच प्रोफेशनल लाइफबद्दलचे प्रत्येक अपडेट देण्यासाठी वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. इंटरनॅशनल सेल्फ केअर डे निमित्ताने आयरा खानने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने आपल्या पर्सनल लाइफबद्दल काही गोष्टींचा खुलासा केलाय. या गोष्टी ऐकून प्रत्येक जण आश्चर्यचकित झालाय.

या व्हिडीओमध्ये आयरा खान सेल्फ केअर आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर बोलताना दिसून आली. यात तिने स्वतःची काळजी घेतल्याने होणारे फायदे सांगितले आहेत. याशिवाय स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे असं देखील तिने या व्हिडीओमध्ये म्हटलंय. तिच्या अगत्सु फाउंडेशनच्या माध्यमातून ती सेल्फ केअरबाबत जनजागृती करणार आहे.

स्वतःला होईल त्रास होईल अशाच गोष्टी करतेय

या व्हिडीओमध्ये आयरा खान म्हणते, “मी विचार करतेय की अशी कोणती गोष्ट आहे जी सेल्फ केअरमध्ये आपण समावेश करू शकतो? अशी गोष्ट जी माझ्या मनाला जर वाईट वाटलं तर ती ते मी माझ्या स्वतःसाठी करू शकते. मी विचार करतेय की मी स्वतःला आनंद देण्यासाठी काय करते? त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जे जे करते त्याने मला केवळ त्रासच होतो…आणि मी एकही गोष्ट अशी करत नाही ज्याने मला माझी स्वतःची काळजी घेता येईल. जे काही करते ते स्वतःला नुकसान पोहोचवण्यासाठीच करतेय…या दोन्ही गोष्टी बिलकूल हसण्यासारख्या नाहीत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

येत्या २४ जुलै रोजी इंटरनॅशन केअर डे असल्याचं देखील या व्हिडीओमध्ये आयराने सांगितलं. तसंच प्रत्येकजण आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी काही ना काही करत राहिल, याचं वचन देखील तिने फॅन्सकडून घेतलंय. तिच्या अगत्सु फाउंडेशनच्या वतीने एक आठवड्यासाठी Pinky Promise to Me या नावाने एक मोहिम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेअतंर्गत प्रत्येक जण आपल्या स्वतःची काळजी घेता यावी यासाठी काही ना काही गोष्टी करणार असल्याचं वचन घेत असतो.

आयरा खान यापूर्वी अनेकदा मानसिक स्वास्थ्य या विषयावर व्यक्त होताना दिसून आली. याआधी आयराने बॉयफ्रेंड नूपुर शिखरेसोबत फोटो शेअर केले आहेत. नूपुर शिखरे हा एक फिटनेस ट्रेनर आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आयराने बॉयफ्रेंड नूपुरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.