२७ व्या केरळ चित्रपट महोत्सवात देशातील आणि जगभरातील चित्रपट निर्माते आणि मनोरंजन जगताशी निगडित व्यक्ती यात भाग घेत आहेत. त्याचबरोबर उत्तमोत्तम चित्रपटही दाखवले जात आहेत. पण आता हा चित्रपट महोत्सव चित्रपट किंवा स्टार्समुळे नाही तर इराणी दिग्दर्शिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. इराणी दिग्दर्शक मेहनाज मोहम्मदी यांनी आपले कापलेले केस फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवले आहेत, यामुळे मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा सुरू आहे.
शुक्रवारपासून केरळ चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामध्ये इराणी दिग्दर्शक मेहनाज मोहम्मदी यांना ‘स्पिरिट ऑफ सिनेमा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण इराणमध्ये महिलांच्या हक्कांसाठी अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्यामुळे त्यांच्यावर प्रवासाची बंदी घालण्यात आली असल्याने त्या या महोत्सवात सहभागी होऊ शकल्या नाहीत. अशा परिस्थितीत आपले कापलेले केस ग्रीक चित्रपट निर्माती अथेना रेचेल त्सांगारी यांच्याकरवी पाठवले. अशा परिस्थितीत अथेनाने तिचा पुरस्कार घेतला आणि तिच्या कापलेल्या केसांसह प्रेक्षकांना संदेश दिला.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून स्नेहलता वसईकर बाहेर
मेहनाज मोहम्मदीने खुलासा केला की ती भेदभावाच्या विरोधात आहे. म्हणून, तिच्या देशातील अधिकार्यांनी बंदी घातली आहे. ‘द न्यूज मिनिट’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या “मी लहान मुलांसाठी आणि किशोरवयीन मासिकांसाठी आणि रेडिओसाठी लिखाणाचं काम करायचे, परंतु जेव्हा मी काही महिलांना भेटलो तेव्हा मी खूप प्रभावित झालो. त्यांच्या आयुष्याबद्दल मलाही अनेक प्रश्न पडले होते, आणि म्हणून मी त्यांची उत्तरे शोधण्यासाठी माहितीपट बनवले.”
याबरोबरच तिचा चित्रपट या माध्यमाच्या ताकदीवर चांगलाच विश्वास आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. २२ वर्षांच्या तरुणीच्या मृत्यूसाठी मेहनाज ह्या हजारो इराणी महिलांबरोबर सध्या मोर्चात सहभागी होत आहेत आणि याविरोधात आवाज उठवत आहे. महोत्सवात केस पाठवल्याने सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे.