गेल्या काही दिवासांपासून बॉलिवूडपासून लांब असणारा अभिनेता इरफान खान लवकरच पुनरागमन करत आहे. तो ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता इरफानला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ मिनिटे ५५ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात ही इरफानची मुलगी राधिका मदनच्या शाळेपासून होते. राधिका अतिशय हुशार असल्यामुळे शाळेमध्ये तिला गौरवण्यात येते. त्यानंतर राधिकाला पुढील शिक्षणसाठी परदेशात जायचे असते. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी इरफान  प्रयत्न करत असतो. या कॉमेडी चित्रटात करिना कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट झाले आहे.

हा चित्रपट २० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले आहे. नुकताच इरफानने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या क्षणचित्रांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यासोबत इरफानने त्याच्या आवाजात एक संदेश रेकॉर्ड केला होता.

काय म्हणाला इरफान?

‘मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी… ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वार्तालाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. जैसा भी होगा, आपको इतेलाह कर दिया जाएगा. कहावत है.. when life gives you lemon, you make a lemonade (आयुष्य जेव्हा तुम्हाला तुमच्या हाती आंबट लिंबू देते तेव्हा त्यांचा गोड लिंबू सरबत बनवावा) बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद!’ म्हटले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irfan khan angreji medium movie trailer is out avb
Show comments