मुंबईमध्ये नुकताच 66 वा फिल्म फेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल याने. बाबिलने इरफान खान यांचे दोन पुरस्कार स्विकारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवंगत अभिनेते इरफान खान यांना ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याचसोबत त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. बाबिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने म्हंटलं आहे कि, या पुरस्कारांसाठी त्याला वडिलांचे कपडे घालायचे होते. या व्हडीओत बाबिलला त्याची आई सुतापा सिकंदर तयार होण्यासाठी मदद करताना दिसतेय.

बाबिलने कॅप्शनमध्ये अॅवॉर्ड सोहळ्यातील त्याच्या भाषणाचा कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे. “मी मुळात म्हणालो “ही काही माझ्या बोलण्याची जागा नाही. लोक नेहमी म्हणतात की वडिलांच्या बुटामध्ये मुलाचा पाय कधीच बसू शकतं नाही पण किमान मी त्यांच्या कपड्यांमध्ये तरी फिट बसू शकतो. माझ्या कुटुंबासाठी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.” असं तो म्हणाला आहे.

यासोबतच बाबिलने वडील इरफान खान यांचे कपडे परिधान करणं का पसंत केलं याचं कारणही सांगितलं आहे. “बाबाला रॅम्प वॉक करणं पसंत नव्हत. मात्र कम्फर्ट झोनमधून बाहेर येणासाठी त्यांनी या कपड्यांमध्ये रॅम्प वॉक केलं होतं. काल रात्री मी नेमके हेच करत होतो. नव्या जागेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न” अशा आशयाचं कॅप्शन त्याने त्याच्या व्हिडीओला दिलं आहे.
या आधी काही व्हिडीओ शेअर करत बाबिलने वडीलांना सन्मानित केल्याबद्दल फिल्म फेअरचे आभार मानले आहेत.