बॉलिवूडचा गुणी अभिनेता इरफान खान ‘पिकू’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. ‘इंफर्नो’ या आगामी हॉलिवूडपटासाठी तो हंगेरीची राजधानी बुडापेस्टला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. रॉन हावर्ड हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. डॅन ब्राऊन यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या या चित्रपटात इरफानबरोबर हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते टॉम हँक्स आणि अभिनेत्री फॅलिसिटी जोन्स दिसणार आहेत. चित्रपटातील माझे लूक, पोशाख आणि अन्य तयारी करण्यासाठी आपण बुडापेस्टला जात असल्याचे इरफानने सांगितले. चित्रपटात मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेबाबत रॉन आणि माझ्यात खूप चर्चा झाली आहे. ही व्यक्तिरेखा कशी दिसेल याबाबतदेखील आम्ही चर्चा केली. या व्यक्तिरेखेचे राष्ट्रीयत्व महत्वाचे नसले तरी तिच्यात थोडेशी ब्रिटिश झलक असणे जरुरीचे आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मी काही संदर्भ शोधत असताना रॉनने आपल्याला काही संकेतस्थळांच्या लिंक पाठविल्याचे इरफानने सांगितले. याआधी इरफानने ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘लाइफ ऑफ पाय’ आणि ‘दी अमेजिंग स्पायडर-मॅन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा