हॉलिवूडपटांमधून भूमिका साकारण्यात आघाडीवर असलेला बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या हवाईमध्ये ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपट मलिकेतील ‘ज्युरासिक वर्ल्ड’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. इरफानच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रायस डल्लास हॉवर्ड या हॉलिवूड अभिनेत्रीबरोबर इरफान चित्रीकरणात व्यस्त आहे. हॉलिवूडमधील उगवती तारका ब्रायस ही महान अमेरिकन दिग्दर्शक रोन हॉवर्ड यांची मुलगी आहे. ‘ज्युरासिक वर्ल्ड’ चित्रपटात ती इरफानबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ब्रायस आणि इरफानने काही थरारक दृष्य साकारली आहेत. ज्यात इरफानने हेलिकॉप्टरवरचा चित्तथरारक स्टंटदेखील केला आहे. ब्रायसला बॉलिवूडबाबत कमालीची उत्सुकता असून, इरफानची या अगोदरची सह-अभिनेत्री नतालिया पोर्टमन आणि ब्रायसने एकाच शाळेत अभिनयाचे धडे गिरवले आहेत. नतालिया आणि इरफानने मिरा नायरच्या ‘किशोर व्हेजिटेरियन’ या लघुपटात एकत्र काम केले आहे. आपल्या सह-अभिनेत्रींविषयी बोलताना इरफान म्हणाला, माझ्या सह-अभिनेत्रींबाबत मी कमालीची नशिबवान आहे. अगदी माझ्या पहिल्या चित्रपटापासूनच मी याबाबत नशिबवान ठरलो आहे. ‘दृष्टी’ या माझ्या पहिल्या चित्रपटात डिंपल कपाडिया माझी सह-अभिनेत्री होती. तब्बूपासून नतालियापर्यंत भूतलावरील काही सुंदर अभिनेत्रींबरोबर मी काम केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा