मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडला देखील ‘याड’ लावलेल्या सैराट चित्रपटाचे बॉलीवूड अभिनेता इरफान खान याने स्पेशल स्किनिंग ठेवले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सैराटमधील परशा-आर्चीची प्रेमकहाणीने इरफान खान भारावला असून, त्याने याधीच नागराजसह चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले होते. ‘सैराट’ चित्रपटाची कथा सध्याच्या तरुण पिढीपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचली पाहिजे असे इरफानचे मत असून, त्याने सैराट चित्रपटाचे स्क्रिनिंग खास लहान मुलांसाठी ठेवले आहे. या खास स्क्रिनिंगला इरफानची मुलं देखील उपस्थित असणार आहेत.

‘सैराट’चा गुजराती आणि तेलगूमध्ये रिमेक!

या खास स्क्रिनिंगसाठीच्या पाहुण्यांच्या यादीत इरफानचे कुटुंबिय आणि त्याच्या मुलांच्या मित्रपरिवाराचा देखील समावेश आहे. याशिवाय, खुद्द नागराज मंजुळे देखील यावेळी उपस्थित असणार आहे.

आता दुबई होणार ‘सैराट’मय

इरफान म्हणाला की, दरवर्षी एक तरी प्रादेशिक सिनेमा चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम करत असतो. यंदा ‘सैराट’ने ते काम केले आहे. मराठी रोमिओ-ज्युलिएटची कहाणी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे आणि हा चित्रपट सध्याच्या तरुणपीढीने जरूर पाहावा, असे मला मनापासून वाटते. भारतीय चित्रपटसृष्टीचे हे नवे पर्व आहे आणि जागतिक पातळीवर सिनेमा घेऊन जाण्याची ताकद या चित्रपटात आहे.

Story img Loader