‘लंच बॉक्स’ चित्रपटानंतर काहीसा रिकामा असलेल्या इरफान खान याने त्याच्या अभिनय कौशल्याला आव्हान देणारी भूमिका करण्याचा निर्णय घेतला आहे. तिग्मांशू धुलियाच्या आगामी चित्रपटामध्ये इरफान पॉर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकाची भूमिका साकारणार आहे.
‘द किलिंग ऑफ ए पॉर्न फिल्म मेकर’ या तिग्मांशू धुलियाच्या आगामी चित्रपटामध्ये इरफान पॉर्न चित्रपट दिग्दर्शकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
“टॉयलेटमध्ये, हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे बसवून हनिमून कपलचे चोरून चित्रिकरण करून पॉर्न फिल्म बनवणाऱ्या पात्राविषयी हा चित्रपट आहे. मात्र, हे गोरख धंदे करणाऱ्या इरफानचे पात्र पुढे जावून चांगल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करते,” असे तिग्मांशू धुलिया म्हणाले.   
‘पानसिंग तोमर’ या चित्रपटानंतर इरफान व तिग्मांशू पुन्हा एकदा हा वेगळ्या धाटनिचा चित्रपट करत आहेत. इरफाने या भूमिकेला न्याय मिळवून देण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे      

Story img Loader