हॉलिवूडच्या ‘स्पायडरमॅन’ चित्रपटात काम केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याने आगामी ‘ज्युरासिक पार्क-४’साठी आपल्याला विचारणा करण्यात आली असल्याची कबुली दिली आहे.  त्यामुळे इरफान खान ‘ज्युरासिक पार्क-४’मध्ये काम करणार असल्याच्या अफवांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कॉलिन ट्रिवोरो दिग्दर्शित ‘ज्युरासिक पार्क-४’मध्ये आपण काम करणार असल्याची माहिती इरफानने दिली आहे. ‘ज्युरासिक पार्क-४’मध्ये आपण नायकाच्या मित्राची भूमिका साकारणार असून या चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखांपैकी एक व्यक्तिरेखा साकारणार असल्याची माहिती इरफानने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना दिली आहे. इरफान खानने तिग्मांशु धुलियासोबत चित्रपट करण्याचे कबुल केले असल्याने अमेरिकेत चित्रिकरण करण्यात येणा-या ‘ज्युरासिक पार्क-४’साठी तारखांचा मेळ घालण्याची करसत इरफानला करावी लागणार आहे.

  

Story img Loader