दिग्दर्शक रितेश बत्राचा पहिलाच चित्रपट ‘डब्बा'(द लंच बॉक्स) या वर्षीच्या लंडन चित्रपट मोहोत्सवामध्ये स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘डब्बा'(द लंच बॉक्स) मध्ये इरफान खान व नवाजुद्दीन सिद्दीकी या दोन हाडाच्या अभिनेत्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या आधी ६६ व्या कान चित्रपट मोहोत्सवामध्ये समिक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात इरफानच्या ‘डब्बा'(द लंच बॉक्स) चित्रपटाने यश मिळवले आहे. कानमध्ये ‘डब्बा'(द लंच बॉक्स) चित्रपटाला क्रिटिक्स ‘विक’ व्ह्युअर्स चॉइस पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. लंडन चित्रपट मोहोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या १३ चित्रपटांमध्ये भारतीय चित्रपटातील केवळ इरफानच्या ‘डब्बा'(द लंच बॉक्स) चित्रपटाला स्थान मिळाले आहे. डब्बा(द लंच बॉक्स) ची निर्मिती गुनीत मोंगा आणि अनुराग कश्यप यांनी केली आहे.
जगभरात अचूकते बद्दल प्रसिध्द असलेल्या डब्बेवाल्यांच्या सेवेवर भाष्य या चित्रपटमध्ये करण्यात आले आहे.
‘डब्बा'(द लंच बॉक्स)  जरी लंडन चित्रपट मोहोत्सवामध्ये जागा मिळवण्यात यशस्वी झाला असला तरी, त्याला इतर चित्रपटांशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. जोनॅ्थन ग्लॅझरचा स्कारलेट जॉहनची नरभक्षक म्हणून भूमिका असणाऱ्या ‘अंडर द स्किन’, पिटर लँडसमॅन यांचा ‘पार्कलँड’, ब्रिटनचे माजी पंतप्रधान जॉहन एफ केनेडी यांच्या हत्येवर आधारीत ‘टेक्सास’ व इतर चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे.

Story img Loader