irrfanकान चित्रपट महोत्सवात ‘जझबा’ चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चनचा लूक प्रसिद्ध केल्यानंतर आता दिग्दर्शक संजय गुप्ताने या बहुप्रतिक्षित चित्रपटातील इरफान खानचे लूक प्रसिद्ध केले. ‘जझबा’ चित्रपटातील इरफानच्या तडाखेबंद लूकचा पोस्टर संजयने टि्वटरवर पोस्ट केला आहे. याआधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ऐश्वर्याच्या लूकला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, संजय गुप्ता नेहमीच आपल्या चित्रपटातील प्रमुख पात्रांच्या दिसण्यावर मेहनत घेत असल्याचे आढळून आले आहे. ‘काटें’ या त्याच्या चित्रपटातील संजय दत्तच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी इरफानच्या डॅशिंग लूकनेसुद्धा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नुकताच प्रदर्शित झालेला पिकू या शूरजित सिरकरच्या चित्रपटात इरफान दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चनबरोबर दिसला होता. ‘जझबा’ चित्रपटात इरफान निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, तर ऐश्वर्या वकिलाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. ९ ऑक्टोबररोजी मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या या चित्रपटात शबाना आझमी आणि अनुपम खेर यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader