दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. लग्नानंतर वर्षभरानंतरच या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या अखेर २०२१ मध्ये या दोघांनी विभक्त होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर करत दिली होती. पण आता नागा चैतन्यला सामंथापासून घटस्फोट घेण्याचा सल्ला प्रसिद्ध अभिनेता आमिर खाननं दिल्याचा आरोप होताना दिसत आहे. यासंबंधी बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक केआरकेचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.

केआरके म्हणजेच कमाल आर खानने आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्यावर बरीच टीका केली होती. आमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे. पण केआरके मात्र सातत्याने आमिर खानवर टीका करताना दिसतो. आता त्यानं यात दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यलाही ओढलं आहे. आमिर खान आणि नागा चैतन्य यांच्यासंबंधीत केआरकेनं केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा- “नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर…” घटस्फोटाबद्दल बोलताना सामंथा झाली भावुक

केआरकेनं त्याच्या एका ट्वीट आमिर खानवर पुन्हा टीका केली आहे. एवढंच नाही तर नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटासाठी देखील आमिर खानच जबाबदार असल्याचं देखील त्यानं म्हटलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये केआरकेनं लिहिलं, “मला माहीत आहे की आमिर खानने नागा चैतन्यला पत्नी सामंथापासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानेच ही गोष्ट नागा चैतन्यला पटवून दिली. म्हणजे आमिरकडे चांगलं मनच नाहीये. तर मग मित्रा तुझा चित्रपट तरी कसा चालेल. यावरील माझी समीक्षा लवकरच प्रकाशित होणार आहे.”

आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये केआरकेनं नागा चैतन्यच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिलं, “नागा चैतन्यने त्याच्या एका दिग्दर्शक मित्राला सांगितलं- मला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट करताना खेद वाटतो. इतकं वाईट होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण आता याला चांगला चित्रपट म्हणण्याशिवाय मी काही करू शकत नाही. बस्स.” दरम्यान आता केआरकेच्या या ट्वीटमध्ये कितपत तथ्य आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही कारण यावर आमिर खान किंवा नागा चैतन्य यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नसली तरी आमिरच्या नावाची चर्चा मात्र सोशल मीडियावर होताना दिसत आहे. नागा चैतन्यबद्दल बोलायचं तर तो आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader