रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर अनेक लोक चित्रपट आणि कलाकारांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत. लोकांच्या रागाचे कारण केवळ रणबीर कपूरचे जुने वादग्रस्त व्हिडिओ नाहीत. आता आलिया आणि रणबीरने पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी दिल्याचेही दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

रणबीर-आलियाने पाकिस्तानातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत केल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. यामुळे आलिया भट्ट ट्विटरवर ट्रेंड होत आहे. ‘आलिया माय फूट’ असा हॅशटॅग वापरून ट्रोलर्स तिच्यावर टीका करत आहेत. ट्रोलर्स या दोघांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकत आहेत.
आणखी वाचा-Video : पुण्यातील भीषण हत्याकांडावर आधारित ‘जक्कल’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित

मात्र, आलिया आणि रणबीरबाबत व्हायरल झालेलं हे वृत खोटं आहे आणि सत्य काही वेगळंच आहे. सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. हे ट्वीट बीबीसी हिंदीच्या नावाने व्हायरल केलं जात आहे. ज्यामध्ये पाकिस्तानमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलिवूड पुढे आले आहे, असे लिहिले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ निर्माता करण जोहरने ५ कोटी, आलिया आणि रणबीरने २ कोटी रुपये दान केले आहेत असं म्हटलं गेलंय.

चित्रपट हिट झाल्यास निर्माते ५१ कोटी रुपये देतील, असंही खोट्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलं आहे. यामध्ये बॉलिवूडचं माणुसकी आणि माणुसकीचे प्रतीक म्हणून वर्णन केले आहे. या पोस्टमुळे लोक आलिया आणि रणबीरवर नाराजी व्यक्त करत आहेत, हे जोडपे शत्रू देशाला मदत करत आहे हे त्यांना सहन होत नसल्याने ते नाराज आहेत.

आणखी वाचा- बॉलिवूडमुळे मुंबईतील चित्रपटगृहं बंद व्हायच्या मार्गावर ; आता वितरकांना अपेक्षा फक्त ‘ब्रह्मास्त्र’कडूनच

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याशी संबंधित हे वृत्त खोटं असल्याचं नंतर स्पष्ट करण्यात आलं. बीबीसी हिंदीच्या अधिकृत हॅन्डलवरून यासंबधी एक ट्वीट करण्यात आलं आणि त्यांच्या ट्विटरच्या नावाने व्हायरल करण्यात आलेलं हे ट्वीट आणि वृत्त खोटं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकांनी आलिया आणि रणबीरचे चित्रपट पाहू नयेत म्हणून काही खोट्या बातम्या पसरवून बॉलीवूड आणि चित्रपट कलाकारांची बदनामी करण्याचा प्रयत्न काही खोडसाळपणा करत आहेत, असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

Story img Loader