‘हमशकल्स’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणाप्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूची अनुपस्थिती लपून राहिली नाही. चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानवर बिपाशा नाराज असल्याची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटातील तम्मना भाटिया आणि इशा गुप्ता या कनिष्ठ सह-अभिनेत्रींप्रमाणे बिपाशाला वागणूक देण्यात आल्याने ती नाराज असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, इशा आणि तमन्नापेक्षा तिला जास्त मानधन मिळाले असून, सैफ अली खानबरोबर चित्रपटाचा खास खेळ दाखविण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. सदर अफवांचे खंडण करत कार्यक्रमाच्या ठिकाणी साजिद म्हणाला, बिपाशाला बरे वाटत नाहिये. ती इथे असायला हवी होती. मला नक्की खात्री आहे पुढील कार्यक्रमांना ती उपस्थित राहील. बिपाशा चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सहभाग घेत नसल्याच्या बातम्या खऱ्या नाहीत.
अलिकडेच झालेल्या करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत बिपाशा हरमन बवेजाबरोबर दिसली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा