‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ बंद झाल्यावर आता कपिल शर्मा आणि त्याची टीम ‘सोनी’ वाहिनीवर नवा कार्यक्रम घेऊन येत असल्याची चर्चा आहे. मात्र, कपिल शर्माच्या अगदी जवळच्या सूत्राने हे वृत्त फेटाळले. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच आम्ही पुढील कार्यक्रमाबद्दल काही सांगू शकू, असे त्याने म्हटले आहे.
टीव्ही माध्यमांतील चर्चांवरून कपिल शर्मा हा सोनीसाठी नवा कॉमेडी कार्यक्रम घेऊन येतो आहे. या कार्यक्रमाचे नावही निश्चित झाले असून, ते ‘कॉमेडी स्टाईल’ असे ठेवण्यात आल्याचे समजते. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये गुत्थीचे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर याने एक ट्विट केले असून, मला लवकरच मेक-अप करायचा आहे आणि तुम्हाला सर्वांना भेटायचे आहे. मान्सूनपूर्वी आपण नक्की भेटू, असे त्यात म्हटले आहे.
कपिलच्या जवळ असलेल्या सूत्राने सांगितले की, सध्या तरी आमचे असले कुठलेही नियोजन नाही. आम्ही स्टार आणि सोनी या दोन्ही वाहिन्यांच्या संपर्कात आहोत. या दोन्ही वाहिन्यांपैकी जे कोणी आम्हाला योग्य वाटेल त्या वाहिनीवर आम्ही नवीन कॉमेडी कार्यक्रम घेऊन येऊ. याबद्दल अधिक मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यातच सांगता येईल, असेही त्याने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is comedy style kapil sharmas new show on sony