कलर्स वाहिनीवरील ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा कार्यक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्याचबरोबर या कार्यक्रमामधील गुत्थी, बुवा, दादी आणि पलक ही पात्रे देखील लोकप्रिय झाली. गुत्थीची व्यक्तीरेखा साकारणारा सुनील ग्रोव्हर काही कारणांनी या कार्यक्रमामधून बाहेर पडला. तेव्हापासून आता गुत्थीची भूमिका कोण साकारणार हा प्रेक्षकांमधला चर्चेचा विषय झाला होता. ‘गुत्थी’ची गुत्थी उलगडली असून, गौरव गेरा ही भूमिका साकारणार असल्याचे समजते.
गौरवने अलीकडेच ‘मिसेस पम्मी प्यारेलाल’ या मालिकेतील प्रमुख स्त्री पात्र साकारले होते. ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’मध्ये सैफ अली खान चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलेला असतानाच्या भागात गौरव गुत्थीच्या वेशभूषेत दिसला. ‘बुलेट राजा’ या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सैफ या कार्यक्रमामध्ये आला होता. यावेळी सुनील ग्रोव्हरप्रमाणेच हावभाव करताना गौरव गेरा नजरेस पडला.
जेव्हापासून सुनील ग्रोव्हरने हा शो सोडला, तेव्हापासून किकू (पलक) गुत्थीला हाका मारून शोधतोय असे या कार्यक्रमाच्या टीव्हीवरील प्रोमोंमध्ये दाखविण्यात येत आहे.
दरम्यान २० नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे निर्माते ‘व्हायकॉम १८’ ने गुत्थी या पात्राचे नाव, भूमिका किंवा वेशभूषा दुसऱ्या कोणत्याही वाहिनीवर वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस वृत्तपत्रातून जारी केली.
हास्यविनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हर या कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला परत आणण्याची मोठ्याप्रमाणावर मागणी केली. गौरव गेराने साकारलेली गुत्थी सुनील ग्रोव्हरच्या तोडीस-तोड असेल का? हे येणारा काळच ठरवेल.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2013 रोजी प्रकाशित
कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये गौरव गेरा ‘गुत्थी’च्या भूमिकेत?
कलर्स वाहिनीवरील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा कार्यक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्याचबरोबर या कार्यक्रमामधील गुत्थी, बुवा, दादी आणि पलक ही पात्रे देखील लोकप्रिय झाली.
First published on: 26-11-2013 at 07:45 IST
TOPICSकॉमेडी नाइट्स विथ कपिलComedy Nights With KapilबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is gaurav gera the new gutthi of comedy nights with kapil