भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या ख्रिसमस साजरा करतानाचे फोटो शेअर केल्यामुळे हार्दिक चर्चेत आहे. या फोटोवरुन हार्दिक पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ख्रिसमसच्या दिवशी हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तो पत्नी नताशा स्टॅन्कोविक आणि मुलगा अगस्त्यसोबत दिसत आहे. दरम्यान, पांड्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर नताशाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये नताशा प्रेग्नंट असल्याचे दिसत आहे. पण याबाबत नताशा किंवा हार्दिकने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आणखी वाचा : ‘माझा देश एका बाजूला आणि माझे वडील…’, ’83’ पाहून मसाबा गुप्ताची भावनिक पोस्ट

हार्दिकला २०१९ मध्ये पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून हार्दिकला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करता आलेली नाही, त्यामुळे त्याचा फटका त्याला सहन करावा लागत आहे. दुखापतीमुळे हार्दिकला खूप त्रास सहन करावा लागला आहे. तो पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करू शकत नाही आणि आयपीएल २०२१ आणि टी-२० विश्वचषकातील त्याची कामगिरी खराब झाली आहे. गेल्या एका वर्षात हार्दिकला वनडे आणि टी-२० मध्ये एकूण ४६ षटके टाकता आली आहेत, ती देखील त्याची गोलंदाजी तितकी मजबूत नाही. त्यामुळेच हार्दिक संघाबाहेर आहे.

हार्दिक सध्या त्याच्या फिटनेसवर काम करत असून वृत्तानुसार तो विजय हजारे ट्रॉफी खेळणार नाही. हार्दिकसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे कारण पुढील दोन वर्षात टीम इंडियाला टी-२० आणि वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. हार्दिक फिट नसेल, तर त्याचे आणि टीम इंडियाचे मोठे नुकसान होऊ शकते.

Story img Loader