बॉलिवुडमध्ये चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी काही तरी निराळी पद्धत वापरण्याचा प्रकार आता काही प्रेक्षकांसाठी नवीन राहिलेला नाही. आलिया भट आणि अर्जुन कपूरच्या आगामी ‘टु स्टेटस’ या चित्रपटाची प्रसिद्धी अशाच अनोख्या पद्धतीने केली जात आहे. आलिया भट आणि अर्जुन कपूर यांच्यातील प्रेमसंबंध हा आतापर्यंत सगळ्यांच्याच चर्चेचा विषय राहिलेला आहे. ‘टु स्टेटस’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या दोघांनी ट्विटरवरून आपण लवकरच एकत्र बंधनात अडकणार असल्याचे जाहीर केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलिया आणि अर्जुनने ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल साईटसवरील चाहत्यांना निमंत्रण दिले आहे.

 

येत्या २८ फेब्रुवारीला ‘टु स्टेटस’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. आलिया भट आणि अर्जुन या सोहळ्यात बंधनात अडकणार असल्याने या सोहळ्याविषयी सगळ्यांनाच आता उत्सुकता लागून राहिली आहे. या सोहळ्याचे ठिकाण असणार आहे ते म्हणजे सोशल साईटसचा प्लॅटफॉर्म आणि या सोहळ्याला येताना शगुन म्हणून ‘टु-स्टेटस’ या चित्रपटाचे तिकीट आणण्याचे मजेशीर आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आलिया आणि अर्जुन या तथाकथित प्रियकर-प्रेयसीचा हा तथाकथित सोहळा कसा होईल याविषयी नेटक-यांना नक्कीच उत्सुकता लागून राहिली असेल. 

Story img Loader