बॉलिवूडमधील अभिनेत्री काजोल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत काजोल चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काजोल आता तिसऱ्या बाळाची आई होणार? असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.
काजोलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. अलीकडेच करण जोहरचा मित्र अपूर्व मेहताचा ५० वा वाढदिवस होता. तर त्याच्या बर्थडे पार्टीला अनन्या पांडेने स्टायलीश लूकमध्ये हजेरी लावली होती. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत काजोलने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे तर काहींनी काजोल प्रेग्नेंट आहे का असा प्रश्न केला आहे.
आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…
खरं तर काजोल प्रेग्नंट नाही. पण बॉडीकॉन तिचं सुटलेलं पोट दिसत होतं. ते पाहून सोशल मीडियावरील युझर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यामुळे काजोलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला बॉडीशेमिंगा सामोरे जावे लागले आहे. काजोलला तिच्या प्रेग्नेंसी विषयी विचारता एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला ‘बेबी?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही प्रेग्नंट आहे की काय?’ फक्त सुटलेलं पोटं पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी काजोलला प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं आहे.