बॉलिवूड अभिनेत्री काजोलची बहिण तनिष्का मुखर्जी ही गेली कित्येक वर्षे चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. पण ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तनिषाने शेअर केलेल्या फोटोमुळे ती विवाह बंधनात अडकल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

तनिषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती समुद्र किनारी असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने, ‘मी जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही मी शिवलेला टॉप परिधान करुन करत आहे. लॉकडाउनमध्ये नवीन गोष्टी शिकले’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील या कलाकाराची बिग बॉस १५मध्ये एण्ट्री

सध्या तनिषाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तनिषाने पायात जोडवी घातली आहेत. ते पाहून तिने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिच्या या फोटोवर एका यूजरने ‘तू गूपचूप लग्न केले का?’ अशी कमेंट केली आहे.

तनिषा बिग बॉस ७मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी अभिनेता अरमान कोहली आणि तिच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचे रिलेशन फार काळ टिकले नाही.