बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘शहजादा’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघंही मॉरीशसमधील शूटिंग शेड्युल पूर्ण करून भारतात परतले आहेत. यावेळचा त्यांचा एअरपोर्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि क्रिती एअरपोर्टवर एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. हाच व्हिडीओ पाहिल्यावर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. क्रिती आणि कार्तिक यांना एकत्र पाहून चाहते त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- घटस्फोटानंतर ४ महिन्यातच प्रसिद्ध अभिनेता पुन्हा चढणार बोहल्यावर, होणाऱ्या पत्नीनं घातलीय ‘ही’ अट

क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरनं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलंय, ‘या दोघांच्या नात्याची मी खूप आतुरतेनं वाट पाहत होतो.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘हे दोघं एकमेकांना डेट का करत नाहीत.’ तर आणखी काही युजर्सनी, ‘आता लग्न करा चाहत्यांना असं त्रास देऊ नका’, ‘तुम्ही आता नात्याची अधिकृत घोषणा करा’ अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- “जेव्हा मला कॅन्सरबद्दल समजलं…” संजय दत्तनं सांगितला हृदयद्रावक अनुभव

दरम्यान कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपूरमलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित धवन करत असून भूषण कुमार, कृष्ण कुमार, अल्लू अरविंद, एस राधा कृष्ण आणि अमन गिल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती यांच्यासोबतच मनीषा कोइराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is kartik aryan and kriti sanon dating each other video goes viral mrj