बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ डिसेंबर २०२१ मध्ये अभिनेता विकी कौशलसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. अर्थात एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्यापासूनच ही जोडी सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत होती. ९ डिसेंबर २०२१ रोजी या दोघांनी राजस्थानच्या सिक्स सेंस फोर्टमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अगदी काही महिने उलटत नाहीत तोपर्यंतच मागच्या काही दिवसांपासून कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. कतरिनाच्या कपड्यांच्या स्टाइलवरून ती गरोदर असल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र आता या सर्व चर्चावर तिचा पती आणि अभिनेता विकी कौशलनं मौन सोडलं आहे.
कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांवर विकी कौशलच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विकी कौशलच्या जवळच्या सूत्रांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘या सर्व चर्चा केवळ अफवा आहे. सोशल मीडियावर पसरवली गेलेली वृत्तं देखील खोटी आहेत आणि यात कोणतंही तथ्य नाही.’ विकी आणि कतरिनानं मागच्या वर्षी लग्नानंतरच त्यांचं नातं ऑफिशिअल केलं होतं. त्याआधी कोणत्याही मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं नव्हतं किंवा नात्यासंबंधीत प्रश्न टाळले होते.
अलिकडेच विकी कौशल आणि कतरिना कैफ एकत्र न्यूयॉर्कमध्ये स्पॉट झाले होते. दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले होते. यात कधी कतरिना गो- टू बेकरीमध्ये पिटस्टॉप बनवताना दिसली होती. तर कधी दोघंही स्विमिंग पूलमध्ये एकमेकांसोबत क्विलिटी टाइम स्पेंड करताना दिसले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.
आणखी वाचा- अभिनेत्रीनं दाखवला ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीचा व्रण, सांगितला वेदानादायी अनुभव
विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अखेरचा ‘सरदार उधम’ चित्रपटात दिसला होता. आगामी काळात तो सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘गोविंदा मेरा नाम’ हा चित्रपट देखील आहे. तर कतरिना कैफ शेवटची ‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे ‘फोन भूत’, ‘मेरी क्रिसमस’ आणि ‘टाइगर 3’ हे चित्रपट आहेत.