सुपरस्टार रजनीकांत यांचा मनोरंजनसृष्टीत जितका दबदबा आहे तितकेच ते राजकारणातही काही महिन्यांपर्यंत सक्रिय होते. २०१७ मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल टाकत असल्याची घोषणा केली होती. साडेतीन वर्ष राजकारणात सक्रिय राहिल्यावर जुलै २०२१ मध्ये त्यांनी राजकारणाला रामराम केला. त्यानंतर ते पूर्णपणे चित्रपटसृष्टीत कार्यरत झाले आहेत. पण आता पुन्हा एकदा रजनीकांत राजकारणाकडे वळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मागचं कारण म्हणजे तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकतीच तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांची राजभवनात भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रजनीकांत आणि राज्यपाल आर.एन. रवी यांची  ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. या भेटीनंतर रजनीकांत पुन्हा एकदा राजकारणात येतील अशी चर्चा समोर येत आहे. विशेष म्हणजे राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 

आणखी वाचा : Bigg boss Telugu 6 : सुपरस्टार नागार्जुन पुन्हा एकदा होस्टच्या भूमिकेत, प्रोमो पाहिलात का?

यावेळी रजनीकांत यांना राजकारणात परत सक्रीय होणार का असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर उत्तर देताना ते नाही असे म्हणाले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर रजनीकांत यांनी अफवांना पूर्णविराम देत आपण राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा : “… म्हणून मी त्याचा आभारी आहे”; आर माधवनचं सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं कौतुक

यासोबत ते म्हणाले, “राज्यपालांची ही भेट औपचारिक होती. राज्यपाल पूर्वी उत्तरेकडील राज्यांमध्ये होते आणि ते आता तामिळनाडूमध्ये आले आहेत. त्यांना तामिळनाडू हे राज्य खूप आवडते. प्रामाणिकपणा, मेहनत आणि राज्यातील जनतेचा खरेपणा त्यांना आवडतो.” यावेळी त्यांनी राज्यपालांचे कौतुक केले आणि त्यासोबत त्यांनी राजकारणात परतणार असल्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दात पूर्णविराम दिला. त्यामुळे ते राजकारणात परतणार नाही हे आता निश्चित झाले आहे.

दरम्यान रजनीकांत लवकरच दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या ‘जेलर’ या चित्रपटात दिसणार आहेत. ‘जेलर’ चित्रपटाचे शूटिंग १५ किंवा २२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर ऐश्वर्या राय बच्चनही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु निर्मात्यांनी अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.