दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मागच्या काही काळापासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला तिचा ‘पुष्पा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या चित्रपटातील रश्मिकाच्या कामाचं बरंच कौतुक झालं. पण आता रश्मिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे ती तिच्या खासगी आयुष्यामुळे. रश्मिका मंदानानं तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती सध्या अभिनेता विजय देवरकोंडा याला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत. पण आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यावरून हे दोघंही गोव्यात एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचं बोललं जात आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य
Sameer Vidwans on Democracy
“समुहाने निवडून दिलेली राजेशाही…”, निवडणुकीनंतर मराठी दिग्दर्शकाची सूचक पोस्ट; म्हणाला, “लोकशाहीच्या नावाखाली…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

नवीन वर्षाच्या सुरुवातीला रश्मिकानं सोशल मीडियावर चाहत्यांना शुभेच्छा देत स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. स्विमिंग पुलच्या बाजूला उभ्या असलेल्या रश्मिकाचा हा फोटो त्यावेळी चर्चेत आला जेव्हा विजय देवरकोंडाचा भाऊ आनंदनं त्याच बॅकग्राउंड आणि लोकेशनचा फोटो शेअर केला. या दोघांचे फोटो समोर आल्यानंतर या रश्मिका आणि विजय यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

रश्मिका आणि विजय यांची जोडी चित्रपटातच नाही तर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र हे दोघंही नेहमीच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं सांगताना दिसतात.

Story img Loader