दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. समांथाला मायोसायटीसचं निदान झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना चिंता सतावू लागली होती. यादरम्यान समांथाने पोस्ट शेअर करत यातून बरे होत असल्याचं सांगितलं होतं. परंतु, समांथाला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त २३ नोव्हेंबरला आलं होतं. त्यामुळे समांथाच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली होती. याबाबत आता समांथाच्या जवळच्या व्यक्तीकडून खुलासा करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथाच्या जवळच्या व्यक्तीने ‘इंडिया टुडे’ला याबाबत माहिती दिली आहे. “समांथा पूर्णपणे बरी असून ती तिच्या घरी आराम करत आहे. तिला रुग्णालयात दाखल केल्या असल्याच्या अफवा आहेत”, असं संबंधित व्यक्तीने सांगितलं.

हेही वाचा>> “तैमूरला जंक फूड…” सैफ अली खानने लेकाच्या खाण्याच्या सवयींबाबत केला खुलासा

काही दिवसांपूर्वीच समांथाने ती मायोसायटीस आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं होतं. समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली होती. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर समांथाने बरे होण्यासाठी उपचार घेत असल्याचं पोस्ट करुन सांगितलं होतं.

हेही वाचा >> “त्याचा नम्रपणा व स्वभाव…” ‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढा यांची विकी कौशलसाठी खास पोस्ट

समांथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून ‘यशोदा’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is samantha ruth prabhu hospitalised for myositis know the truth kak