अभिनेत्री श्रुती हसन बुधवारी आपला २९वा वाढदिवस साजरा करीत असून, यावेळचा वाढदिवस सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांबरोबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे तिने योजले आहे. चाहत्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची सविस्तर माहिती छायाचित्रासकट सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. तिच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्याच्या आयुष्यात चांगला बदल घडविणारे कार्य करण्यावर श्रुतीचा नेहमी विश्वास राहिला आहे. तिच्या या विचारांमुळेच यावेळच्या वाढदिवशी तिने हा खास ऑनलाईल उपक्रम राबविला आहे. चाहत्यांनी अलीकडेच केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती छायाचित्रासकट सोशल मीडियाद्वारे तिला पाठविण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. यातून उत्कृष्ट पाच जणांची निवड करून श्रुती हसनची स्वाक्षरी असलेल्या भेटवस्तू तिच्या खास संदेशासह या निवडक पाच जणांना पाठविण्यात येणार असल्याची माहितीदेखील तिच्या जवळच्या सूत्रांकडून मिळाली.
‘रॉकी हॅंडसम’, ‘वेलकम बॅक’, ‘मैं गब्बर’, ‘यारा’ आणि महेश बाबूंबरोबरच्या एका अनाम तेलगू चित्रपटात ती दिसणार आहे.

Story img Loader