भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल मागच्या काही काळापासून त्याच्या खेळापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुकरलाशी त्याचं नाव बऱ्याच काळापासून जोडलं जात होतं. सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता शुबमनचं नाव प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानशी जोडलं जात आहे. दोघांच्या डिनर डेटचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता सारा अली खान आणि शुबमन गिल यांच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही रिपोर्टनुसार हे फोटो दुबईमधील एका रेस्टॉरंटमधील आहेत. तर काही रिपोर्टनुसार हे फोटो लंडनच्या कोणत्यातरी रेस्टॉरंटमधले आहेत. ज्या ठिकाणी सारा अली खान आणि शुबमन गिल डिनर करताना दिसत आहेत.
आणखी वाचा- “विराटच्या खराब कामगिरीसाठी अनुष्का जबाबदार” केआरकेचं ‘ते’ ट्वीट व्हायरल

hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

सध्या टीम इंडिया दुबईमध्ये आशिया कप २०२२ खेळत आहे. मात्र शुबमन या टीमचा सदस्य नाही आहे. पण काही रिपोर्ट्सनुसार तो लवकरच इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर शुबमन झिम्बाम्बेमध्येही धाडकेबाद खेळी खेळताना दिसला होता. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकरला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यानंतर तो सारा अली खानसह स्पॉट झाला आहे. मात्र त्याआधी नात्याच्या एवढ्या चर्चा सुरू असतानाही सारा तेंडुलकर किंवा शुबमनने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

आणखी वाचा- सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचे ब्रेकअप? दोघांच्या ‘या’ कृतीमुळे चर्चांना उधाण

दरम्यान इंडियन प्रीमियर लीग २०१९च्या वेळी पहिल्यांदा सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होता. त्यावेळी शुबमनच्या प्रत्येक कृतीशी साराचं नाव जोडलं जात होतं. दुसरीकडे सारा अली खान बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचे वडील सैफ अली खान बॉलिवूडचे स्टार कलाकार आहेत. तर आई अमृता सिंगही एकेकाळची गाजलेली अभिनेत्री आहे.

Story img Loader