तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ च्या सुरुवातीपासूनच काही ना काही कारणाने चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात करण कुंद्रा आणि तिच्या नात्याची बरीच चर्चा झाल. पण आता करण आणि तेजस्वी यांचं हे नातं खोटं किंवा एक गेम प्लान असल्याचं बोललं जात आहे. याआधी देवोलिना आणि राखी यांना तेजस्वी प्रकाशचा खरा बॉयफ्रेंड दुसराच कोणीतरी आहे असं बोलताना अनेकदा ऐकायला मिळालं आहे. पण आता हीच गोष्ट सोशल मीडियावरही चर्चेत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याला तेजस्वी डेट करत असल्याचं बोललं जात असून या दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर सध्या तेजस्वी प्रकाशच्या खऱ्या बॉयफ्रेंडच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता क्रिश खेडेकर तेजस्वीचा खरा बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. इ-टाइम्स टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार क्रिश आणि तेजस्वी मागच्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. क्रिशचं खरं नाव विनित खेडेकर आहे मात्र त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटनुसार त्याला क्रिश या नावानेच सर्व ओळखतात. दरम्यान क्रिशनं तेजस्वी प्रकाशचे कोणतेही फोटो ठेवलेले नाही. काही काळापूर्वी त्यानं तेजस्वीसोबतचे फोटो डिलिट केले आहे. पण तेजस्वीच्या इन्स्टाग्रामवर मात्र क्रिशसोबतचे काही व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.
याशिवाय सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तेजस्वी प्रकाश डान्स शिकताना दिसत आहे आणि तिथेच बसलेला क्रिश तिच्याकडे प्रेमानं पाहत आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्वीची आई देखील दिसत आहे. ज्यावरून क्रिशचं तेजस्वीच्या कुटुंबीयांशीही चांगलं बॉन्डिंग असल्याचं दिसून येतं.
क्रिश आणि तेजस्वी एकमेकांना मागच्या वर्षभरापासून ओळखत आहेत. पण बिग बॉसच्या घरात ज्या भयंकर नात्याचा उल्लेख तेजस्वी सुरुवातीपासून करत आहे ती व्यक्ती क्रिश नाही. ती व्यक्ती दुसरीच कोणीतरी ज्याचा उल्लेख तिने करणसोबत बोलताना केला होता. क्रिश आणि तेजस्वी एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात असलं तरीही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मात्र क्रिशनं हे नाकारलं आहे. आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं त्यानं सांगितलं आहे.